Thu, Apr 25, 2019 12:21होमपेज › Konkan › दै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन 

दै. ‘पुढारी’चा आज ७९ वा वर्धापन दिन 

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:23PM

बुकमार्क करा
कणकवली  : प्रतिनिधी

  महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक  म्हणून बहुमान मिळविलेल्या दै. ‘पुढारी’ने आपल्या देदीप्यमान कारकीर्दीची 79 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. सोमवार, 1 जानेवारी 2018 रोजी दैनिक ‘पुढारी’ 80 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त दैनिक ‘पुढारी’च्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात सोमवारी सकाळी 10.30 वा. एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आणि सिंधुदुर्ग जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी दिलीप पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 

निः पक्ष आणि निर्भीड दैनिक म्हणून दै.‘पुढारी’ची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. दै. ‘पुढारी’ला 79 वर्षांचा राष्ट्रीय, निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील सर्वांत वेगाने वाढणारे दैनिक म्हणून दै. ‘पुढारी’ने आपले  ‘पुढारी’पण सिद्ध केले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दै. ‘पुढारी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आपल्या निःपक्ष आणि निर्भीड पत्रकारितेमुळे दै. ‘पुढारी’ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मुखपत्र’ बनले आहे. सोमवारी साजरा होणार्‍या वर्धापन दिन विशेष कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.