Wed, Nov 14, 2018 08:03होमपेज › Konkan › नोकरीच्या आमिषाने तरुणांना लाखोंचा गंडा

नोकरीच्या आमिषाने तरुणांना लाखोंचा गंडा

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:30PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आखाती देशात चांगली नोकरी देण्याच्या नावाखाली शहरातील राजिवड्यासह जिल्हाभरातील अनेक तरुणांना एका महिलेने सायबर कॅफे चालकाच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. नोकरी देण्यासाठी संबंधित महिलेने प्रत्येक तरुणांकडून  75 हजार रुपये उकळले. पासपोर्ट जमा केल्यानंतर बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही नोकरीचा कॉल न आल्याने तरुणांच्या कुटुंबीयांचे डोळे उघडले. मंगळवारी त्या महिलेला गाठून शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

नोकरीच्या नावाखाली पैसे घेणार्‍या महिलेने राजिवड्यातील 14 तरुणांकडून प्रत्येकी  75 हजार रुपये घेतले. पासपोर्ट तयार असलेले आणि विदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेले तरुण हाती लागावेत यासाठी त्या महिलेने मारुती मंदिर येथील एका सायबर कॅफे चालकाची मदत घेतली.