Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Konkan › श्री क्षेत्र कुणकेश्‍वरात जन्माष्टमी व श्रावणी सोमवारचा जल्लोष

श्री क्षेत्र कुणकेश्‍वरात जन्माष्टमी व श्रावणी सोमवारचा जल्लोष

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:10PMदेवगड : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र कुणकेश्‍वर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला उत्सव तसेच हरिनाम सप्ताह दिमाखात पार पडला. या उत्सवांबरोबरच श्रावणी सोमवार असल्याने भाविक भक्तांची अलोट गर्दी झाली. सोमवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली. त्यानंतर रात्रौ 12 वा. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा धार्मिक विधी पार पाडण्यात आला. 

श्रावणी सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान प्रसिध्द उद्योजक शिरिष शिरसाठ (पनवेल) यांना देण्यात आला. सदर प्रथम पूजा सकाळी 6 वा. त्यांच्या हस्ते करण्यात आली. शिरीष शिरसाठ यांचे श्री क्षेत्र कुणकेश्‍वर देवस्थानसाठी मोठे योगदान असून प्रथम पुजाप्रसंगी त्यांनी श्रीं चे दैनंदिन महापूजेसाठी  व महाप्रसादासाठी लागणारे कलश, ताम्हण, ताट व इतर सामान चांदीमध्ये घडवून आणून सुमारे 3 लाख किंमतीच्या चांदीच्या वस्तू देणगी स्वरूपात देवस्थानास प्रदान केल्या. 

ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 वा. हरिनाम सप्ताहाची सांगता झाल्यावर पालखी प्रदक्षिणा व श्रीं ची मिरवणूकीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला गेला व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. श्रावणी सोमवार असल्याने मोठी गर्दी होती. दिवसभरामध्ये महनिय व्यक्ती व देणगीदार यांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली. यावेळी बुवा भगवान लोकरे (भांडूप) यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम व श्री काळभैरव महिला फुगडी संघ, हिंदळे यांचा कार्यक्रम पार पडला.