Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Konkan › जामगेतील शिवसृष्टी ठरणार पर्यटकांना पर्वणी!

जामगेतील शिवसृष्टी ठरणार पर्यटकांना पर्वणी!

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:02PMखेड : प्रतिनिधी

राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नांंमधून तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्‍वरी-मानाई देवस्थान परिसरात पर्यटकांसाठी धार्मिक स्थळांना भेटींसोबतच शिवसृष्टी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्या द‍ृष्टीने गेल्या कित्येक वर्षांपासून कदम यांचे सुरू असलेले प्रयत्न आता मूर्तरूप घेऊ लागले असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी पर्यटकांना पाहता येणार आहे.

कोकणातील चिपळूण तालुक्यातील सावर्डेनजीक डेरवण येथे 1984 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती देणारे देखावे व मावळे यांचा समावेश असलेली शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. त्यानंतर आता खेड तालुक्यातील जामगे गावात श्री कोटेश्‍वरी-मानाई देवस्थानच्या परिसरात अशाच प्रकारचा प्रकल्प शिवसेना नेते रामदास कदम यांच्या संकल्पनेतून उभा राहत आहे. 

कोकणात येणार्‍या पर्यटक अनेक देवस्थानांना भेटी देत असतात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज व कोकणचे असलेले द‍ृढ नाते व त्याचा समृद्ध इतिहास यांची माहिती मिळवण्याची त्यांना संधी उपलब्ध होत नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री पद सांभाळतानाच शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या खेड तालुक्यातील जामगे या गावातील कोटेश्‍वरी मानाई देवस्थान परिसरात छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोंढाणा किल्ला जिंकण्यापूर्वीचा प्रसंग देखाव्यातून पर्यटकांना पाहता यावा, यासाठी उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जामगे कोटेश्‍वरी मानाई देवस्थानकडे जाणार्‍या मार्गाच्या दुतर्फा जांभ्या दगडाची तटबंदीही उभारण्यात आली आहे.

URL : Jamge, Shivshrushti, destination, tourists, konkan news