Sun, Feb 23, 2020 10:22होमपेज › Konkan › ‘जैतापूरची बत्ती’ झाली ‘सौरबत्ती’

‘जैतापूरची बत्ती’ झाली ‘सौरबत्ती’

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:34PM

बुकमार्क करा

जैतापूर : वार्ताहर

जैतापूर- माडबन गावातील लाईटहाऊस आता सौरऊर्जेवर चालणार असून या भागात सौरऊर्जेचा वापर करण्यात केंद्र शासनाला यश आले आहे. त्यामुळे ‘जैतापूरची बत्ती’ आता ‘जैतापूरची सौरबत्ती’ म्हणून नावारूपाला येणार आहे.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जगात जैतापूरबरोबर माडबन गाव गाजत आहे. याच माडबन गावात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होवु घातला आहे. अणुउर्जा प्रकल्प होउ नये, यासाठी जैतापूर पंचक्रोशीमध्ये तसेच जागतिक पातळीवर विरोध होत असताना दिसत आहे. यामध्ये जैतापूर गावाचा काडीमात्र संबंध नसल्यामुळे जैतापूर गावाला केंद्रशासनाचा कोणताच निधी मिळालेला नाही. याच माडबन गावात अणुऊर्जा प्रकल्प सुरू होण्याअगोदरच सौरऊर्जेवर केंद्रशासनाचा नुकताच उपक्रम सुरू झाला आहे.

जैतापूर, माडबन पठारावर वाघापूर म्हणून संबोधण्यात येत असलेल्या ठिकाणी केंद्र शासनाचा सन 1958 सालातील लाईट हाऊस आहे.  या  लाईट हाऊसचा उपयोग खोल समुद्रामध्ये छेट्या मोठ्या जहाजांना दिशा दाखविण्यासाठी होतो. जहाजाला कळते कि, आपण नेमके कुठल्या भागात आहोत. हा लाईट हाऊस सन 1881 सालात सुरू झाला आहे. त्यावेळी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वीज नव्हती. त्यावेळी तीन लाकडाचे ढिग संध्याकाळवर पेटवले जात असत. ते रात्र असे पर्यंत ठेवले जात.तिन लाकडाचे ढग पेटवन्याचा उद्देश म्हणजे जैतापूरचा लाईट हाऊस असे समजायचे कालांतराने बदल होत जनरेटर,  विजेचा वापर होऊ लागला आहे.आत्ता एका मिनिटाला लाईटचे रोटेशनमध्ये चार फ्लॅश पडतात, तेव्हा समजायचे कि जैतापूर लाईट हाऊस जवळपास आहे.

याच लाईट हाऊसमधील यंत्रणा आत्ता सौर ऊर्जेवर सुरू झाली आहे. माडबन गावावर मोठे पठार असल्याने सौर ऊर्जेचा वापर करून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, हे केंद्र सरकारनेच याच माडबन गावात करून दाखवले आहे. यावर प्रकल्प बाधित गावातील जनतेने मग केंद्रशासनाला अणुऊर्जा प्रकल्प का हवा आहे? असा सवाल विचारला आहे.सौर ऊर्जेचा वापर सर्व प्रथम जैतापूरमध्ये  एका बंगल्यामध्ये करून सौर ऊर्जा कशी असू शकते हे सिध्द करून दाखवले आहे. जैतापूर, माडबन, वाघापूर भागातील लाईट हाऊसचा मोठा उपयोग जैतापूर मुसाकाझी बंदर ,विजयदुर्ग बंदराला होणार असून या दोन्ही भागात जल प्रवासी वाहतूक व मालवाहतूक लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत जैतापूर बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी दिले आहेत.