होमपेज › Konkan › ‘जेएसडब्ल्यू’च्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन

‘जेएसडब्ल्यू’च्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीमार्फत रत्नागिरीतील चाफेरी विनायकवाडी येथे आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्लांटभोवती राहणार्‍या लोकांना सुरक्षित जीवन देणे, ही आमची प्रथमिक जबाबदारी आहे. येथील समाज हा आमच्या उपक्रमांच्या केंद्रस्थानी असून, एक जबाबदार कार्पोरेट नागरिक या नात्याने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहोत. रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पाभोवती आंब्याची बाग तयार करणे हा याच पावलांचा एक भाग असून, समाज तसेच पर्यावरणाविषयी असलेली आमची जबाबदारी आंबा उत्पादनाशी कोणतीही तडजोड न करता पर्यावरणाचा समतोल राखत आम्ही पार पाडत आहोत. आंबा महोत्सव म्हणजे या मोसमाचे सेलिब्रेशन आहे, असे मत जेएसडब्ल्यू एनर्जीचे रत्नागिरी युनिटचे प्रमुख यतिश छाब्रा यांनी व्यक्‍त केले. यावेळी एच. आर. हेड विजय वाघमारे, प्राध्यापक पुजारी आदी उपस्थित होते.

आंब्याची बाग विकसित करण्याचा जेएसडब्ल्यू एनर्जीचा उपक्रम हा येथील लोकांचे जीवन बदलणारा असून, त्यामुळे येथील सभोवतालच्या लोकांचे जीवनमान उंचावले आहे. आंबा महोत्सवादरम्यान उच्च दर्जाचे आंबे वितरीत केले जाणार असून, फलोत्पादन तज्ज्ञांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली या बागेतील आंबे तयार होत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी चांगले उत्पन्न यावे, यासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली अंगिकारली जात आहे. त्यांच्या बागांमध्ये चांगल्या दर्जाच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली जात आहे.

आंबा महोत्सवादरम्यान प्रध्यापक पुजारी हे स्थानिक लोकांना आंब्याची काजी कशी घ्यावी, या मोसमात आंब्याची लागवड करताना कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन करणार आहेत. जेएसडब्ल्यू एनर्जीने 30 एकर जागेवर आंब्याची बाग तयार केली असून या बागेत 12 हजार आंब्याची झाडे लावली आहेत. आंबा महोत्सवासारख्या उपक्रमांद्वारे रत्नागिरी भागातील पर्यावरण आणि इको सिस्टिमचे जतन करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असणार आहे.