Tue, Apr 23, 2019 18:22होमपेज › Konkan › आवाज नको वाढव डीजे तुला, पोलिसाची शपथ हाय..!

आवाज नको वाढव डीजे तुला, पोलिसाची शपथ हाय..!

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आवाज वाढव डीजे, तुला आयची शपथ हाय... या गाण्याच्या बोलाप्रमाणे आवाज वाढविल्यास साऊंड ऑपरेटरला कारवाईला सामोरे जावे लागत होते.कोकणात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना, आगमन व विसर्जन मिरवणुकीत साऊंडचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी मोठ्याने लावण्यात येणार्‍या डॉल्बी सिस्टीमचा त्रास लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच होत असतो. त्यामुळे यावर्षी दोन टॉप-दोन बेसची परवानगी पोलिस यंत्रणेने साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना दिल्यानंतर आवाज किती डेसिबल असावा याचे प्रात्यक्षिक शनिवार पोलिस मैदान व मारुती मंदिर सर्कल बाहेर घेण्यात आले. या प्रात्यक्षिकावेळी साऊंड सिस्टीम ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता कमिटी बैठकीच्यावेळी साऊंड सिस्टीम ऑपरेटर व व्यावसायिकांनी पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. त्यावेळी उदयराज सावंत यांनी पोलिसांनीही कशा पद्धतीने डेसिबल मोजावे याविषयी काही नियम असल्यास ते सांगावेत असे सांगतानाच आवाजाचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी साऊंड ऑपरेटिंगबाबत प्रात्यक्षिक घ्यायचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार काल शनिवारी रत्नागिरी पोलिस मुख्यालय मैदानात शांततेच्यावेळी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मारुती मंदिर सर्कलच्या समोर गर्दीच्यावेळी प्रात्यक्षिक करण्यात आले.  जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले. रत्नागिरी शहरचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा व त्यांच्या कर्मचार्‍यांनी साऊंड सिस्टीम व्यावसायिकांची आवाज संघटनेच्या सहकार्यातून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सुरुवातीला काय उपक्रमआवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा (स. 6 ते रात्री 10) 75 डेसिबल व रात्री (रात्री 10 ते स. 6) 70 डेसिबल, व्यापारी क्षेत्र दिवसा 65 डेसिबल तर रात्री 55 डेसिबल, निवासी क्षेत्र दिवसा 55 डेसिबल व रात्री 45 डेसिबल तर शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल तर रात्री 40 डेसिबल एवढी आहे. 

पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी डेसिबल रीडर मशिनच्या माध्यमातून  आवाज किती असावा याची माहिती दिली.  यावेळी आवाज संघटना रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप घडशी, अमोल विलणकर, उदयराज सावंत यांच्यासह 40 ते 50 व्यावसायिक यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल या व्यावसायिकांनीही पोलिस अधिकार्‍यांचे आभार मानले.