Thu, Apr 25, 2019 03:38होमपेज › Konkan › जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 10:58PMरत्नागिरी  : शहर वार्ताहर

जिल्ह्यात शनिवारी बरसलेल्या पावसाने रविवारीही संततधार कायम ठेवली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 115.22 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून 1 जून ते आतापर्यंत 931.50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या ईमेल संदेशानुसार जिल्ह्यात 26 जूनपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

दि. 24 जून रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात मौजे दाभोळ येथे मुराद पाल नाईक यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मासेगुजर येथील व हर्णे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मौजे आंर्जल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मुरडी येथे जोग नदीची संरक्षण भिंत कोसळली आहे.

चिपळूण तालुक्यात मौजे पिंपळी खु. येथे गजानन बाबाजी पाष्टे यांच्या गोठ्याचे  पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यात मौजे वाडगाव येथील गजेंद्र सदाशिव गोसावी, वय 45 वर्षे हे 23 जून रोजी बेर्डेवाडी येथे लघुपाटबंधार्‍यात मासे पकडण्यासाठी गेले असता पाटबंधार्‍यातील गाळात अडकून मृत झाले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 115.22 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून 1 जून ते आतापर्यंत 931.50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  तालुकानिहाय पावसाची आकडेवारी  पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटरमध्ये आहेत.  मंडणगड- 110, दापोली- 122, खेड- 96, गुहागर- 248, चिपळूण-62, संगमेश्वर- 69, रत्नागिरी - 203, लांजा 70 आणि राजापूर तालुक्यात 57  मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.