Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Konkan › कोकणातील ११० प्रस्ताव मंजूर, १८ लाखांपर्यंत कर्जाची मर्यादा

जलयुक्त यंत्रसामुग्रीसाठी व्याज अर्थसहाय्य

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 9:04PM

बुकमार्क करा
रत्नागिरीः प्रतिनिधी

जलयुक्त शिवार अभियानात जल आणि मृद संधारणाच्या कामाकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्रसामग्रीद्वारे कामे जलदगतीने करण्यासाठी खरेदी करण्यात येणार्‍या यंत्रसामुग्रीसाठी व्याज अथर्र्सहाय्य योजना राबविण्यात आली आहे. यासाठी कोकणातील 110 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून या  लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

राज्यात जलयुक्त शिवार अभियान /जल व मृदसंधारणाची कामे करण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार तरुण, शेतकरी  उत्पादन संस्था, नोंदणीकृत शेतकरी गटास,  बेरोजगारांची सहकारी संस्था आदींद्वारे जलयुक्त शिवार योजनेतील यांत्रिकतेची कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. त्याद्वारे त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात यतो.  याकरिता यंत्रसामुग्री खरेदी  केलयास त्यावर व्याजाचे अनुदान देण्यात येते. 

या योजनेत 18 लाखांचे कर्ज मंजूरी करण्यात येते. त्यासाठी देण्यात  येणारे व्याज शासनातर्फे देण्यात येणार आहे. योजनेत पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जाची उपलब्धता करुन देण्यात येते. त्यासाठी प्रचलित व्याजदर आकारण्यात येत असून हा व्याज शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे.

मात्र, घेण्यात येणार्‍या कर्जाचे हप्ते संबंधित लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत देणे बंधनकारक आहे. योजनेसाठी सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कृषी उत्पादक संस्था, बेरोजगाराची सहकारी संस्था, नोंदणीकृत शेतकरी गट, कृषी सहकारी संस्था असा प्राधान्यक्रम ठेवण्यात आला आहे. या योजनेसाठी कोकणातील पाच जिल्ह्यांतून 110 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.