Sat, Nov 17, 2018 21:18होमपेज › Konkan › कोकण विद्यापीठासाठी  प्रभू , गीते यांचा आग्रह

कोकण विद्यापीठासाठी  प्रभू , गीते यांचा आग्रह

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:41PMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता स्वतंत्र्य विद्यापीठाची गरज असून तस आग्रह केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे धरला आहे. कोकणातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक, प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना विद्यापीठाच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून स्वतंत्र विद्यापीठ अंतर्गत असे पहावे, अशा आशयाची विनंती उभय मंत्र्यांनी केली आहे. 

स्वतंत्र कोकण विद्यापीठ विद्यार्थ्यांना हवे असल्यास त्या मागणीचा सकारात्मक विचार करा, तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींची मिटींग बोलावून जून 2018 पर्यंत पूर्वी निर्माण करा असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत केले आहे. कोकण विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी विद्यापीठाच्या प्रश्‍नासंदर्भात मंत्र्यांची दिल्लीत भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. सुरेश प्रभू व अनंत गीते यांनी कोकण विद्यापीठाच्या प्रश्‍नात सक्रिय लक्ष घातल्याने विद्यापीठाचा प्रश्‍न लवकरचा मार्गी लागेल तसेच उभय मंत्र्यांचे आभार डॉ. विलास पाटणे यांनी मानले आहेत.

 

Tags : Konkan, Konkan news,  Konkan University, Anant Geete,