Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Konkan › इंडिया पोस्ट बँक टपाल खात्यात क्रांती करेल : नितेश राणे

इंडिया पोस्ट बँक टपाल खात्यात क्रांती करेल : नितेश राणे

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:36PMदेवगड : प्रतिनिधी

विश्‍वासार्हता आणि पारदर्शकतेमुळे भारतीय टपाल खात्याची वाटचाल आजही देदीप्यमान राहिली आहे. स्पर्धेच्या युगात टपाल खात्याने अनेक काळानुरुप बदल घडविले आहेत. इंडिया पोस्ट बँक ही सेवा टपाल खात्यात नवी क्रांती निर्माण करणारी ठरणार असून या सेवेमुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.ही संकल्पना आपल्या देशामध्ये चांगल्याप्रकारे रुजेल असा आशावाद आ. नितेश राणे यांनी भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शुभारंभावेळी व्यक्‍त केला.

नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,उपनगराध्यक्ष संजय तारकर,देवगड डाक उपविभागाचे डाक निरीक्षक संकेत परब आदी उपस्थित होते.इंडिया पोस्ट बँकेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले.यावेळी देवगड डाक उपविभागाचे डाक निरीक्षक परब यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ध्येय,उदिष्टये आणि सर्व सामान्य जनतेला त्याचा कसा फायदा होणार आहे,याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटांचे अनावरण तसेच खातेधारकांना क्यु-आर कोडचे वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन नीलेश जाधव तर आभार पवार यांनी मानले.