Mon, Mar 25, 2019 05:12
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › प्रधानमंत्री विमा योजनेसाठी स्वतंत्र कक्ष

प्रधानमंत्री विमा योजनेसाठी स्वतंत्र कक्ष

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 10:02PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

हंगामात शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीसह अपघाती आपत्तीमध्ये विमा संरक्षण मिळावे, यासाठी राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री विमा  योजनेला  जिल्ह्यात 100 टक्के सहभागासाठी  कृषी विभागाच्या सर्व शाखांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक कृषी कार्यालत विमा मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.

विमा  योजनेला जिल्ह्यात शेतकर्‍यांचा 100 टक्के प्रतिसाद मिळावा यासाठी या योजनेचा विमा हप्ता भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महा इ-सेवाकेंद्रांत सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर रेशन दुकानांध्येही ही सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

खरीप हंगाम 2018- 19  मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत  कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत पात्र ठरविण्यात येणार आहेत. योजनेत सहभाग घेतल्यानंतर पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. पीक पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत नुकसानभरपाई निश्‍चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्‍चित करणे, काढणीपश्‍चात नुकसान ,काढणी पश्‍चात, स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळू शकते.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी दि युनायटेड इंडिया इन्शुन्स कंपनी लि. ची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुकास्तरावर  कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक कर्यालय, जिल्हा परिषद कृषी अधिकारी कार्यालय  आदी ठिकाणी स्वतंत्र कक्षाद्वारे विमा मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करुन देण्यात आली  आहेत.