Mon, Apr 22, 2019 04:23होमपेज › Konkan › जिल्हा बँकेच्या नूतन वास्तूचे आज खा. राणे यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा बँकेच्या नूतन वास्तूचे आज खा. राणे यांच्या हस्ते उद्घाटन

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 10:49PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्गनगरी येथील नूतन वास्तूचा उद्घाटन  सोहळा मंगळवार, 1 मे  रोजी सकाळी 10.30 वा. माजी मुख्यमंत्री तथा  खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आ. हसन  मुश्रीफ, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर  कारखान्याचे अध्यक्ष आ.  सतेज पाटील, माजी खा. नीलेश राणे, आ. नितेश  राणे, जि.प. अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावेे, असे  आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी  व मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिरुध्द  देसाई यांनी केले आहे.

Tags : Konkan, Inauguration, new, district, bank, building, MP Rane