Wed, Feb 20, 2019 08:38होमपेज › Konkan › शहीद मेजर कौस्तुभ राणे कुटुंबीयांना मदत नको तर समाजाला  करा : विजय रावराणे

शहीद मेजर कौस्तुभ राणे कुटुंबीयांना मदत नको तर समाजाला  करा : विजय रावराणे

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:15PMवैभववाडी : प्रतिनिधी

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या  कुटुंबीयांना कोणाच्याही आर्थिक मदतीची आवश्यकता नाही.यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला मदत करायचीच असेल तर कौस्तुभ राणेंच्या नावाने समाजातील गोरगरीब रुग्ण, गरजू विदयार्थी तसेच सामाजिक उपक्रमांसाठी मदत करावी,असे आवाहन कौस्तुभ राणे यांचे काका तथा सडुरेचे माजी सरपंच विजय रावराणे यांनी केले आहे.

वैभववाडी येथील भैरी भवानी प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावराणे बोलत होते. बंडू मुंडले उपस्थितीत होते. ते म्हणाले, कणकवली येथील दहीहंडी उत्सव रद्द करुन तो निधी आ.नितेश राणे कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मदत देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. आ. राणे यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. मात्र. याबाबत आम्ही कुटुंबीयांनी चर्चा करुन असा निर्णय घेतला आहे की, शासकीय मदतीशिवाय कोणाचीही आर्थिक मदत कुटुंबीय स्वीकारणार नाही. ज्यांना अशी इच्छा असेल त्यांनी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या नावाने समाजातील गोरगरीब रुग्ण, गरजू विदयार्थी, समाजिक उपक्रमांना मदत  दयावी. असे आवाहन आम्ही सर्वांना करीत आहोत.

शहीद कौस्तुभ राणे यांच्या शौर्याचा, बलिदानाचा वापर कोणीही वैयक्‍तीक लाभासाठी करू नये. राजकीय पक्ष अथवा कोणत्याही व्यक्‍तीने त्यांच्या नावाचा लाभासाठी गैरवापर करू नये.भावना आणि प्राप्त परिस्थितीत याची गल्लत करू नये अशी विनंती  कुटुंबीयांच्यावतीने श्री. रावराणे यांनी केली आहे.

वैभववाडीत सैनिक अ‍ॅकॅडमी सुरू करावी 

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या नावाने वैभववाडीत सैनिक अ‍ॅकॅडमी सुरू करावी.जेणेकरुन तालुक्यातील सर्वसामान्यांची मुले सैन्यात भरती होऊन देश सेवा करतील, अशी  भावना रावराणे यांनी व्यक्‍त केली.