Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Konkan › ‘नाणार’: सेना आमदार अधिवेशन गाजवणार : उदय सामंत

‘नाणार’: सेना आमदार अधिवेशन गाजवणार : उदय सामंत

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 10:57PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

कोकणातील शिवसेनेचे आमदार नाणार-रिफायनरीचा संघर्ष विधानसभेत गाजवणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते आ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दि.4 जुलैपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर सेनेचे आमदार कोणती भूमिका घेणार आहेत, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण कोकणात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे निधीची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. तो निधी मिळवण्यासाठी कोकणातील सर्व आमदार संघटित होऊन अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचेही आ. सामंत यांनी यावेळी सांगितले. नाणार विरोधात पावसाळी अधिवेशनात संघर्ष करणार असल्याचेही ते म्हणाले.

मिरजोळेतील भूस्खलन रोखण्यासाठी जुन्या संरक्षक भिंतीपुढे नवी 56 मीटरची दुसरी संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून हे काम जानेवारी महिन्यात सुरू होईल, अशी आशा आ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मनरेगा’ अंतर्गत वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नर्सरींना आंबा-काजूची 15 लाख रोपे बांधण्यास सांगण्यात आली.

परंतु, आता परमीटची अट घालून त्याच नर्सरीवाल्यांना अडचणीत आणण्यात आले आहे. यातून नुकसानीत आलेल्या नर्सरीवाल्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे. अशी एखादी दुर्घटना घडली तर सहन केली जाणार नाही, असेही आ.सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक राजन शेट्ये उपस्थित होते.