Wed, May 22, 2019 17:08होमपेज › Konkan ›  शासनाची फसवणूक प्रकरणी  वैद्यकीय अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

 शासनाची फसवणूक प्रकरणी  वैद्यकीय अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 10:48PM
सावंतवाडी : प्रतिनिधी 

उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी पत्नी शिक्षिका असल्याची माहिती लपवून ती घरकाम करीत असल्याची खोटी माहिती देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याच्या  विरोधात येथील पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयाला त्याने चुकीची माहिती सादर केली होती. विजय गणेश तोरसकर (रा. न्यु सालईवाडा, सावंतवाडी)  असे त्याचे नाव आहे. 

गुरुवारी ऊशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली. तोरसकर हे उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी कार्यालयात  आले व स्वत:चा व्यवसाय वैद्यकीय असल्याचे  सांगितले तसेच आपले उत्पन्न 1,80,000 रु.  इतके सांगितले होते. मात्र, जबाबात पत्नीचा व्यवसाय घरकाम व मुले विद्यार्थी म्हणून सांगून तलाठी (ग्रामीण) मनोज निंबाळकर यांच्याकडून दाखला घेऊन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सेतुकडे अर्ज केला होता.  दाखला तपासणीसाठी  अव्वल कारकुन श्रीम. अस्मिता नाईक यांच्याकडे गेला असता त्यांनी आयकर विवरणपत्र जोडण्यास श्री. तोरस्कर यांना कल्पना दिली. त्या नंतर ते पुन्हा तलाठी यांच्याकडे जाऊन आपली पत्नी शिक्षिका असल्याचे सांगितले व त्यांनी  6,75,000/- चे आयकर विवरणपत्र सादर केले. त्यावर  निंबाळकर यांनी  त्यांना विचारले असता ते कोणतेही कागदपत्रे  कार्यालयात  जमा केले नाहीत किंवा योग्य ते उत्तर दिले नाही.

दरम्यान, झालेल्या चौकशीत तोरसकर यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शपथपत्रावर खोटी माहिती दिली व शासनाची फसवणूक केली म्हणून तहसीलदारांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.