Mon, May 20, 2019 08:37होमपेज › Konkan › जामसंडेमध्ये रात्रीत चार दुकाने फोडली

जामसंडेमध्ये रात्रीत चार दुकाने फोडली

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:35PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

जामसंडे बाजारपेठेतील चार दुकाने फोडून चोरट्यांनी  मंगळवारी रात्री 2 लाख 18 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या चोर्‍यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास येताच दुकानदारांना धक्‍का बसला. या घटनेमध्ये बालाजी फोटो स्टुडिओमधील रोख रकमेसह सुमारे 1 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

बालाजी फोटो स्टुडिओमध्ये मागील खिडकीतून प्रवेश बालाजी फोटो स्टुडिओचे मालक सचिन देशपांडे हे बुधवारी सकाळी 9 वा. दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. दुकान उघडल्यानंतर मागील खिडकीचे ग्रिल तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दुकानाची तपासणी केली.  

यावेळी दुकानातील 40 हजार रुपये रोख रक्‍कम, 70 हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा, 45 हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा, 20 हजार रुपये किमतीची निकॉन कंपनीची फ्लॅश गन, 8 हजार रुपये किमतीची सिम्प्लेक्स फ्लॅश गन, 1500 रुपये किमतीचे तोशिबा कंपनीचे 16 जीबीचे मेमरी कार्ड, 1200 रुपये किमतीची सँडिस्क कंपनीची 8 जीबीची दोन मेमरी कार्डे, 9 हजार रुपये किमतीची निकॉन कंपनीची लेन्स असा 1 लाख 94 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

बालाजी फोटो स्टुडिओलगतच असलेले अनिकेत पेडणेकर यांच्या काडसिद्धेश्‍वर आर्ट सेंटर हे दुकान फोडून  दुकानातील 1 हजार रोख रक्‍कम लंपास केली.