Wed, Sep 26, 2018 14:09होमपेज › Konkan › शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते २७ रोजी होणार उद्घाटन

अ.भा.वि.प.चे कोकण प्रदेश ५२ वे अधिवेशन रत्नागिरीत

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 9:11PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 32 वर्षानंतर रत्नागिरीत 52 वे कोकण प्रदेश अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन बुधवार दि.27 रोजी सायं.5 वा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नगर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे होणार आहे.

राष्ट्रीय पुनर्निमाणाचे स्वप्न बाळगून देशभरातील छात्रशक्तीला रचनात्मक कार्यासाठी संघटीत करून शैक्षणिक क्षेत्रात अभाविप गेली 69 वर्षे संस्कारित दंडशक्ती म्हणून यथार्थपणे उभी आहे. गेल्या सहा दशकांच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांनी अनामिकतेने परिषदेच्या कार्यपद्धतीचा वसा घेतला, आणि विविध क्षेत्रात जोपासला. याच अभाविपचे रत्नागिरीत दि.27 ते 29 डिसेंबर या कालावधीत 52 वे कोकण प्रदेश अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ना. विनोद तावडे उपस्थित राहाणर आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन असणार आहेत. यावेळी प्रदेशअध्यक्ष डॉ.वरदराज बापट, प्रदेश मंत्री प्रमोद कराड, स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे, स्वागत समिती सचिव अ‍ॅड.श्रीरंग भावे, शहराध्यक्ष प्रभात कोकजे, शहर मंत्री श्रीजीत वेलणकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनानिमित्त गुरूवार दि.28 डिसेंबर रोजी ‘समरस भारत, समर्थ भारत’ या विषयावर सकाळी 9.15 वा. अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री जी.लक्ष्मण भाषण करणार आहेत. सायं. 5 वा. राष्ट्रीय महामंत्री आशिष चव्हाण यांची लक्ष्मीचौक मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. शुक्रवार दि.29 रोजी स.11.15 वा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणवर परिसंवाद होणार असून यामध्ये एस.एन.डि.पी. महिल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव के.वेंकटरमणी, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे यांनी केले आहे.