Sat, Feb 23, 2019 06:04होमपेज › Konkan › ...तर एसपी हटाव आंदोलन छेडावे लागेल!

...तर एसपी हटाव आंदोलन छेडावे लागेल!

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:46PMसावंतवाडी : प्रतिनिधी

वादग्रस्त सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांची तत्काळ बदली न केल्यास ‘एसपी हटाव’ आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी दिला. महिला कलाकारांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या एपीआय अरुण जाधव यांची बदली झालीच पाहिजे... झालीच पाहिजे... एस पी...हाय हाय’च्या घोषणाबाजी करीत कलंबिस्त ग्रामसचिवालयासमोर स्वाभिमानच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले

स्वाभिमान पक्षाच्या सुंदरवाडी महोत्सवास सावंतवाडीत आलेल्या कलाकारांना मध्यरात्रौ ते राहत असलेल्या  हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करुन  त्रास दिल्याप्रकरणातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांची बदली केली जावी,या मागणीसाठी 63 गावात करण्यात येणार्‍या साखळी उपोषण आंदोलनची सुरुवात कलंबिस्तपासून झाली.

दरम्यान उपोषणाच्यावेळी उपस्थित असलेल्या स्वाभिमानच्या महिला पदाधिकार्‍यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी जोरदार नाराजी व्यक्‍त केली. पोलिस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करीत ‘जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम हाय हाय’च्या घोषणा दिल्या.या आंदोलनाला आता उग्रस्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे.

संजू परब म्हणाले, नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू राहणार असून कलाकरांसोबत एपीआय जाधव कसे वागले हे हॉटेलमधील सीसीटीव्हीत  सुंदरवाडी महोत्सव बंद करण्यासाठी  हे कारस्थान रचण्यात आले होते.एपीआय अरुण जाधव यांच्या मागे कोण आहे? असा सवाल त्यांनी करुन डीएसपींनी या अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई केली नाही उलट त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे हे  निषेधार्थ असल्याचे श्री.परब म्हणाले.हे आंदोलन सनदशीर मार्गाने पक्षाच्या वतीने छेडले जाणार असून आजपासून या आंदोलनाचे रणशिंग कलंबिस्तमधून फुंकले आहे. उद्या सावरवाड गावात त्यानंतर सांगेली अशी दहा उपोषणे होणार आहेत.शेवटी शहरात भव्य मोर्चा आंदोलन होणार आहे. कधीही न झाला असा ‘न भुतो न भविष्यती’असा मोर्चा काढण्याचा इशारा  श्री. परब यांनी दिला.

सावंतवाडी तालुक्यातील 63 गावात होणारे आंदोलन हे सुंदरवाडी महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांचा अपमान करणार्‍या पोलिस सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव यांची बदलीच्या मागणीसाठी आहे. तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली न झाल्यास एसपी हटाव मोहीम राबवू ,असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनास  पं.स.सभापती रवींद्र मडगावकर,माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, तालुका सरचिटणीस किरण सावंत,संदेश बिड्ये, सरपंच शरद नाईक, नामदेव पास्ते, गजानन पास्ते, संदेश बिडये, अनंत सावंत, आंतोन रॉड्रिक्स, महेश सावंत, दिलीप राऊळ, लीना रॉड्रिक्स, राजश्री मेस्त्री, अनिल सावंत, साक्षी राऊळ, न्हानू जाधव, कविता जाधव, राजश्री जाधव, वैशाली जाधव, माधुरी जाधव, स्मिता जाधव, मोहन बिडये सुप्रिया कलबिस्तकर, वामन नार्वेकर,विजय पास्ते,रेश्मा सावंत  आदी उपस्थित होते.