Thu, Apr 25, 2019 06:16होमपेज › Konkan › महाडमध्ये बेकायदेशीर भंगार व्यवसाय सुरूच!

महाडमध्ये बेकायदेशीर भंगार व्यवसाय सुरूच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड : श्रीकृष्ण बाळ 

बांगलादेशी दहशतवादी इसमाच्या अटकेनंतर संपूर्ण महाड तालुक्यात बांधकाम व्यावसायिक, भंगार विक्रेते याच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र महाड शहराच्या हद्दीमध्ये पालिकेच्या ना हरकत दाखला शिवाय 10 ठिकाणी भंगार विक्रेत्या कडून राजरोसपणे व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. दरम्यान या व्यवसायांना आवश्यक असणारा ना हरकत दाखला महाड पालिकेने दिला नसल्याने मिळालेल्या व्यावसायिक परवान्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

शहरातील काजलपुरा, आदर्श नगर मध्ये 3, खारकंड मोहल्ला येथे 3, मुंबई –गोवा महामार्गावरील चाभारखिंड जवळ, बुटाला पंपा जवळ  तसेच बस स्थानक जवळ अशा 10 ठिकाणी भंगार व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहेत. यापैकी काही जणाकडे व्यावसायिक परवाना (शॉप अॅक्ट) प्राप्त करण्यात आल्याची माहिती महाड पालिकेच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

यामुळे  पालिकेच्या पूर्व परवानगी शिवाय गेल्या अनेक वर्षा पासून हे व्यवसाय राजरोसपणे कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत यासंबंधी नागरिकांकडून विचारणा होत आहे.  तर महाड पालिकेकडून स्वच्छता अभियाना करीता शहरात प्रयत्न सुरू आहेत.  त्यामुळे शहरातील तिन्ही प्रवेशद्वारावर सुरु असलेल्या या बेकायदेशीर भंगार विक्रेत्या विरोधात महाड पालिका आता कोणती कारवाई करणार याकडे महाडकराचे लक्ष लागून राहिले आहे 

 

Tags : Mahad, बांगलादेशी दहशतवादी, Illegal scrap business, action, Mahad Municipal Council‎,


  •