Mon, May 27, 2019 09:23होमपेज › Konkan › गावतळे येथे खैराची बेकायदा वाहतूक

गावतळे येथे खैराची बेकायदा वाहतूक

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:25AM

बुकमार्क करा
दापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील गावतळे परिसरामध्ये असलेल्या कातभट्टी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात खैराची वाहतूक होत आहे. ही वाहतूक विनापरवाना होत असल्याचे दिसून येत आहे. गावतळे गावानजीक कातभट्टी व्यवसाय असून या कातभट्टी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराचा साठा दिसून येत आहे. मात्र, या बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. या ठिकाणी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांमधून खैर विक्रीसाठी आणला जातो. मात्र, वनविभागाच्या  दप्‍तरी अशाप्रकारची खैर वाहतुकीची कोणत्याही प्रकारचा परवाना घेतल्याची नोंद असलेली दिसत नाही. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिक खरेदी करत असलेला खैर हा नेमका कोणत्या पद्धतीने खरेदी करतात, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे वनविभागाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून, ज्या ठिकाणी कातभट्टीवर खैर विक्री होत आहे, अशा ठिकाणी कारवाई होताना दिसून येत नाही. 

विनापरवाना खैर खरेदी गावतळेतील कात व्यावसायिक करीत असून वनविभागाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रकार हे कातभट्टी व्यावसायिक करत आहेत. कातभट्टी व्यावसायिकांनी नेमका किती टन खैरसाठा करावा, यासाठी नियमावली काय आहे? या बाबत संबधित अधिकार्‍यांकडून सांगितले जात नाही. त्यामुळे कातासारखे व्यवसाय करणारे लाखोचा महसूल बुडवूनआणि विभागाची फसवणूक करुन राजरोस विनापरवाना खैराची खरेदी करीत आहेत. तरी वनविभागाने अशा चोरट्या खैर खरेदीला कायद्याचा चाप बसवून लगाम घालावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.