Tue, Sep 25, 2018 08:38होमपेज › Konkan › आधारकार्डमुळे मृताची ओळख

आधारकार्डमुळे मृताची ओळख

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:00PM खेड : प्रतिनिधी 

या अपघातात कारमधून प्रवास करणारी नसरीन अहमद अली देशमुख (52, रा. फॅमिलीमाळ दापोली) या महिलेचा मृत्यू झाला तर अहमद अली महंमद खान देशमुख (61,रा. दापोली) हे जखमी झाले. अपघातानंतर  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस कर्मचारी मयेकर करत आहेत.   

दुसर्‍या अपघातातील माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास लवेल पेट्रोल पंपानजीक रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला भरधाव वेगाने महामार्गावरून जाणार्‍या वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. मृताजवळ सापडलेल्या आधारकार्ड वरून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव विशाल ओमप्रकाश असे आहे. तो उत्तर प्रदेश मधील गौरा, कटरा गुलाब सिंह प्रतापगढ या ठिकाणचा रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.