होमपेज › Konkan › पतीची तब्बल 35 वर्षांनी बेपत्ताची तक्रार

पतीची तब्बल 35 वर्षांनी बेपत्ताची तक्रार

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:40PMदोडामार्ग : वार्ताहर

झोळंबे येथून बेपत्ता झालेल्या पतीची फिर्याद पत्नीने तब्बल 35 वर्षांनी येथील पोलिस ठाण्यात दिली.इतक्या मोठ्या कालावधीनंतर बेपत्ताची तक्रार दाखल करण्यास आल्याने पोलिसांकडून आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले.झोळंबे येथील लक्ष्मण सखाराम गवस  हे 1983 मध्ये घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याबाबत त्यांची  पत्नी लक्ष्मी गवस यांनी 23 एप्रिल रोजी  बेपत्ताची तक्रार  कळणे पोलिस दूरक्षेत्रात दिली.हवालदार विजय केरकर यांनी त्यांची तक्रार नोंद करून घेतली आणि प्रकरण पोलिस निरीक्षकांकडे आणले. प्रभारी पोलिस  निरीक्षक कोळी यांनी त्यांच्याकडे पतीबाबत सखोल चौकशी करून प्रकरण तपासासाठी ठेवले.

Tags : konkan, Husbands, missing, complaint, 35 years