Thu, Nov 15, 2018 14:43



होमपेज › Konkan › चिपळुणात घरगुती वादातून पत्नीचा खून

चिपळुणात घरगुती वादातून पत्नीचा खून

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:21PM



चिपळूण : खास प्रतिनिधी

शहरातील पेठमाप येथे पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुन्‍नी आदम शेख (मूळ रा. आंध्रप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. 

याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुन्‍नी शेख यांचा भाऊ वली मस्तान सय्यद हा त्यांच्या जवळच्याच इमारतीत राहतो. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बहीण मुन्‍नी व तिचे पती आदम अक्रुद्दीन शेख यांच्यामध्ये सातत्याने वादविवाद होत असत. या वादातून पती आदम शेख याने पत्नीचा खून केल्याची फिर्याद वली सय्यद याने दिली आहे. यानुसार पती आदम अक्रुद्दीन शेख याच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी, मात्र, पत्नी मृत झाल्याचे पती आदम याच्या शुक्रवारी सकाळी लक्षात आले. या नंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी घातपाताचा संशय आल्यानंतर भाऊ वली सय्यद याने पोलिसांत तक्रार केली आहे. पती आदम शेख याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.