Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Konkan › वैभववाडी नळपाणी योजनेला चक्रीवादळाचा फटका

वैभववाडी नळपाणी योजनेला चक्रीवादळाचा फटका

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:50PMवैभववाडी : वार्ताहर

तालुक्यात झालेल्या चक्रिवादळाचा मोठा फटका वाभवे-वैभववाडी नं.पं.च्या नळपाणी योजनेला बसला आहे.शहरवासियांना टंचाई भेडसावू नये यासाठी टँकरने पाणी पुरवठा न.पं.च्या वतीने करण्यात येत आहे.अशी माहिती नगराध्यक्षा दीपा गजोबार,उपनगराध्यक्ष रविंद्र तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

शहरात झालेल्या चक्रीवादळात नळपाणी योजनेकडे पुरवठा करण्यात आलेल्या विद्युत वाहिन्या जमिनदोस्त झाल्या होत्या.ट्रान्सफॉर्मरही बंद पडला होता.काही अंशी पुरवठा सुरुही करण्यात आला आहे. मात्र अजूनही कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने मोटार पंपात वारंवार बिघाड होत आहे.त्याचा फटका शहरवासियांना बसत होता.परंतु न.पं.ने पर्यायी पाण्याची व्यवस्था सुरू केली आहे.

प्रत्येक वार्डामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.आणखी एक टँकर वाढविण्यात येणार आहे.पाण्याची गैरसोय होणार नाही  गैरसोय उद्भवल्यास (02367/237248) या नंबरवरती संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.