Sat, May 30, 2020 10:14होमपेज › Konkan › चक्रीवादळ पुनर्वसन केंद्रे कागदावरच

चक्रीवादळ पुनर्वसन केंद्रे कागदावरच

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:34PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टी भागात चक्रीवादळासारख्या आपत्तींचा सामाना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात चक्रीवादळ पुनर्वसन केंद्रे प्रस्तावित  करण्यात आली होती. कोकणात ‘फयान’ वादळानंतर शासनाने हा निर्णय घेेताना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नऊ  चक्रीवादळ पुनर्वसन केंद्रांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यात वरवडे येथे एक केंद्र उभारण्यात आले. मात्र, उर्वरित केंद्रे कागदावरच राहिली. अलीकडेच ओखी चक्रीवादळाच्या  पार्श्‍वभूमीवर या केंद्रांची निकड अधोरेखित झाल्यानंतर या केंद्रांच्या प्रस्तावावरील धुरळा झटकण्याचा प्रयत्न आता प्रशासनाने केला आहे.

नैसर्गिकरीत्या संवेदनशील असलेल्या कोकण किनारपट्टी भागात फयान वादळानंतर किनारपट्टी भागात होणार्‍या वित्तहानीबरोबरच जनजीवनही विस्कळीत झाले. 
या केंद्रांमध्ये नैसर्गिक आपत्तीत विस्थापित होणार्‍यांचे तात्पुरते  सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी ही केंद्रे उपयोगी ठरणार आहेत. त्यानुसार येथे निवारा, औषधोपचार, अन्नछत्र आदी सुविधा देण्यात येणार होत्या. 

नऊ केंद्रांच्या प्रस्तावाला दिली होती मान्यता

‘फयान’च्या तडाख्यानंतर कोकणात वादळासारख्या स्थितीत होणार्‍या विस्थापनासाठी सुरक्षित निवारा केंद्रांची गरज प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालक्यात एक याप्रमाणे नऊ चक्रीवादळ पुनर्वसन केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.