Sat, Aug 17, 2019 17:11होमपेज › Konkan › सावंतवाडीतील ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

सावंतवाडीतील ऐतिहासिक काझी शहाबुद्दीन हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:11PMसावंतवाडी : प्रतिनिधी  

सावंतवाडी एसटी बस स्थानकासमोरील ऐतिहासिक वास्तू आगीच्या  भक्ष्यस्थानी’ पडली आहे. यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. ही  आग सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास लागली.
यात काझी शहाबुद्दीन वास्तूला आग लागल्यामुळे आगीत इमारतीचे सर्व छप्पर जळून लाखोंचे नुकसान झाले. या इमारतीशेजारी ही रेकॉर्ड रुम होती सुदैवाने आग त्या इमारतीकडे पसरली असती तर मोठा अनर्थ झाला असता. ऐतिहासिक वास्तूत  कचर्‍याचा ढिगारा साचला होता. दुपारी तीन वाजता आगीच्या ज्वाळा रस्त्यावर येत असताना देवसू येथील सदाशिव परब  व निरवडे येथील अमेय प्रभूतेंडोलकर यांनी पाहिले. परब यांनी शेजारीच असलेल्या तहसीलदार कार्यालयाच्या रेकॉर्ड रुममधील कोतवाल यांना सांगितले, पोलिसांना 100 नंबरवर व नगरपरिषदेला कळविले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग विझविण्यासाठी नागरिकांची धाव घेतली हाकेच्या अंतरावर असलेला अग्निशामक बंब  दुरुस्तीसाठी पाठविल्याने आरोग्य विभागाच्या टँकरने पाणी मारुन आग विझविली जात होती.

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, चंद्रकांत कासार तसेच शांताराम वेतुरेकर,नंदू गावकर यांच्यासह तालुका  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष   मांजरेकर, नगरपरिषदेचे  कर्मचारी केळबाईकर,बेग,विनोद सावंत, यांनी  मेहनत घेतली.दरम्यान सावंतवाडी पोलिसात न. प. चे कर्मचारी विनोद सावंत यांनी अज्ञाताविरुद्ध तक्रार  सायंकाळी उशिरा दिली.याप्रकरणी संशयित दोन दिवसात सापडेल असा विश्‍वास नगराध्यक्ष साळगावकर यांनी व्यक्त केला.दरम्यान या जळीत प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज तपासणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले.