Sat, Jan 19, 2019 15:46होमपेज › Konkan › हिंदू संस्कृती देशाचा कणा

हिंदू संस्कृती देशाचा कणा

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:15PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

हिंदू संस्कृतीने जगाला बंधुभाव शिकवला. समतेची शिकवण दिली. हिंदू संस्कृती एक जीवन पद्धती आहे. म्हणून हिंदू संस्कृती देशाचा कणा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.  राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या कोकण प्रांतात हिंदू चेतना संगमचे एकाच वेळी 268 ठिकाणी आयोजन केले आहे. शहरातील शिर्के हायस्कूलच्या पटांगणावर रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून अनिरुद्ध देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यंकर-कुलकर्णी, प्रा. सुशील वाघधरे, जिल्हा संघचालक आनंद मराठे, नगर संघचालक मनोहर पंडित आदी उपस्थित होते. ध्वजवंदनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.