Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Konkan › हिंमतगडाला सुरूंग स्फोटामुळे धोका

हिंमतगडाला सुरूंग स्फोटामुळे धोका

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 8:56PMमंडणगड : प्रतिनिधी

सागरी सेतू कामासाठी लागणारी खडी मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून बाणकोट येथील हिंमतगड किल्ला परिसरात वारंवार सुरूंग स्फोट करण्यात येत आहेत. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीस धोका निर्माण झाला आहे. पुरातत्त्व विभागाने या सुरूंग स्फोटांना परवानगी देऊ नये, अशी मागणी दुर्गप्रेमींतून होत आहे.बाणकोट परिसरातील नागरिकांनी सुरूंग स्फोटांमुळे घरांना तडे जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे केली होती. या संदर्भात प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

स्फोटांची मालिका अशीच सुरू राहिल्यास किल्ल्यांची जुनी तटबंदी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाणकोट ग्रामपंचायत हद्दीत  समुद्रसपाटीपासून दीड हजार मीटरवर या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. किल्ल्याजवळ किल्लावाडी व बलदेववाडी आहे. 

बाणकोट-बागमांडला सागरी सेतूच्या कामासाठी हिंमतगड किल्ला ज्या टेकडीवर उभा आहे त्या टेकडीच्या पायथ्याशीच काळे दगड फोडून खडी करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.  खडी करण्यासाठी संबंधितांकडून सुरूंग स्फोट करण्यात येतात. मात्र, या स्फोटांमुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे स्फोट तातडीने थांबवण्यासाठी पुरातत्त्व विभागाने सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.