Wed, Aug 21, 2019 20:01होमपेज › Konkan › आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर!

आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर!

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 11:30PMचिपळूण : समीर जाधव

राज्यातील आरोग्य सेवा सद्यस्थितीत तरी रामभरोसे सुरू आहे.  राज्याच्या सार्वजनिक आरोग्यासाठी शासनाकडे निधीची कमतरता आहे. राज्यात सरासरी 2 लाख 34 हजार लोकसंख्येमागे एक रुग्णालय आहे, तर 4264 लोकांमागे रुग्णालयातील एक बेड उपलब्ध आहे. अशी स्थिती असून राज्यभरात आरोग्य विभाग अंतर्गत तब्बल 15 हजार 750 पदे रिक्‍त आहेत. यामुळे लोकांना खासगी आरोग्य सेवेकडे जावे लागत आहे.

जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार 40 लोकसंख्येमागे रुग्णालयात 1 बेड असणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात 4264 लोकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अवघा एक बेड उपलब्ध होऊ शकतो, एवढी कमतरता आहे. राज्यातील आरोग्य सेवा कर्मचार्‍यांअभावी कोलमडून पडली आहे. अनेक ठिकाणी प्रा. आ. केंद्र व उपकेंद्रात कर्मचार्‍यांची वानवा आहे. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचार करणे कठीण होत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांची 1611 पदे रिक्‍त असून प्रयोगशाळांमधील 131 पदे रिक्‍त  आहेत, तर तीन हजार परिचारिका भरलेल्या नाहीत. यामुळे अतिरिक्‍त कामाचा ताण आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात 1490 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 935 पदे भरली असून 555 पदे रिक्‍त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1199 पैकी 716 पदे भरली असून 403 पदे रिक्‍त आहेत. रायगडमध्ये 1452 पदांना मंजूरी असून 1095 पदे भरली असून 357 रिक्‍त आहेत. पालघरमध्ये 692 पैकी 524  भरली असून 88 रिक्‍त आहेत. ठाणेमध्ये 3853 पैकी 2950 भरली असून 903 पदे रिक्‍त आहेत. मुंबईत 382 पैकी 258 भरली असून 24 रिक्‍त आहेत. नागपूर विभागात 8948 पैकी 5875  पदे भरली असून 3079 रिक्‍त आहेत. अमरावती विभागात 2276 रिक्‍त आहेत. 2586 रिक्‍त आहेत. नाशिक विभागात 2176 पदे रिक्‍त आहेत, तर पुणे विभागात 3295 पदे रिक्‍त असून राज्यात 53,688 मंजूर पदांपैकी 37,938 भरण्यात आली आहेत. 15, 750 पदे रिक्‍त आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्‍त कामाचा ताण येत आहे.
 

Tags : Health Service, Ventilator, Chiplun, Hospital