Wed, Nov 14, 2018 12:13



होमपेज › Konkan › नागरिकांचे समाधान ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी

नागरिकांचे समाधान ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 9:03PM

बुकमार्क करा





कणकवली : वार्ताहर

हरकुळ बुद्रुक मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला आंब्रड जि. प. मतदारसंघातील निवडणुकीमध्ये मिळाली. लोकांना समाधानकारक सेवा देणे हिच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांनी दर्जेदार विकास कामे उभी केल्याने या भागाचा खर्‍या अर्थाने विकास करता आला. माझ्या नावलौकिकात आनंद ठाकूर सारख्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. येत्या काळात रोजगार देणार्‍या उपक्रमांवर भर देताना नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. 

हरकुळ बुद्रुक ग्रा. पं. चे आय.एस.ओ. मानांकन वितरण व नूतन सभागृह उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सतीश सावंत बोलत होते. सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, जि.प. सदस्या सौ. राजलक्ष्मी डिचवलकर, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सरपंच आनंद ठाकूर, पं.स. सदस्य मंगेश सावंत, सुभाष सावंत, सौ. दिव्या पेडणेकर, उपसरपंच दिनकर पेडणेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, माजी उपसभापती बाबा वर्देकर, ब्ाुलंद पटेल, नवनिर्वाचित सरपंच गौसीया पटेल, माजी पं. स. सदस्य महेंद्र डिचवलकर,  सोसायटीचे चेअरमन डॉ. अनिल ठाकूर, करंजे सरपंच मंगेश तळगांवकर, विस्तार अधिकारी अरूण चव्हाण, सूर्यकांत वारंग, रमेश पावसकर, राजेश पावसकर, मोहन सोहनी आदी उपस्थित होते. मावळते सरपंच आनंद ठाकूर व सहकारी सदस्य, सेवानिवृत्त नळकामगार रामचंद्र कदम, नूतन सरपंच व सदस्य, ग्रामविकास अधिकारी दीपक तेंडुलकर, वामन मेस्त्री तसेच गावातील कन्यारत्न प्राप्त मातांचा ठेव प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला. 

सतीश सावंत म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून होणार्‍या कामांचे सोशल ऑडीट नागरीक करत असतात. कार्यकर्त्यांमध्ये विकासाविषयी तळमळ असल्यास मोठे काम उभे राहते त्याचे मूर्तीमंत उदाहरण हरकुळ बुद्रुक ग्रा. पं. आहे. आयएसओ मानांकन प्राप्त  झाल्याने नागरीकांना दर्जेदार सेवा देणे ही जबाबदारी आहे. महिलांनी विकासप्रक्रियेत पुढाकाराने सहभागी व्हायला हवे. नागरीकांच्या सहभागातून विकासाला खर्‍या अर्थाने गती मिळते, असे सौ. भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले.  

सुनील रेडकर, रमेश पावसकर, बुलंद पटेल, प्रा. भरमू नौकुडकर, डॉ. अनिल ठाकूर, बाबासाहेब वर्देकर आदींनी मनोगत व्यक्‍त करत आनंद ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन दीपक  तेंडुलकर,  प्रास्ताविक सरपंच आनंद ठाकूर यांनी केले. आभार पोलीस पाटील संतोष तांबे यांनी मानले.