Tue, May 21, 2019 22:36होमपेज › Konkan › हापूस आंबा ‘कॅनिंग’च्या दारात

हापूस आंबा ‘कॅनिंग’च्या दारात

Published On: May 07 2018 11:39PM | Last Updated: May 07 2018 11:34PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

स्थानिक ठिकाणी दुसर्‍या टप्प्यातील हंगाम सुरू होण्याआधीच  आंब्याचा प्रवास कॅनिंगकडे सुरू झाला आहे. परदेशी आणि देशी बाजारपेठेत पहिल्या टप्प्यातील आंबा गेल्यानंतर आणि उत्पादनात घट झाल्याने दर चढा राहिला होता. आता शेवटच्या टप्प्यातील आंबा स्थानिक बाजारपेठेत येण्याऐवजी थेट कॅनिंगच्या दारात पडत आहे. 

यंदा प्रतिकूल हवामानाने आंबा उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारात दर वाढले होते. मात्र, आता शेवटच्या टप्प्यातील आंबा स्थानिक बाजारपेठेत येणे अपेक्षित होते. मात्र, तत्पूर्वीच त्याचा प्रवास कॅनिंगकडे सुरू झाला आहे. दररोज सुमारे 40 ते 45 टन आंबा कॅनिंगसाठी परजिल्ह्यांत जातो. प्रारंभीचा किलोला 30 रुपये दर मिळाला आहे. मात्र, गतवर्षी 35 ते 38 रुपये दराने गेलेला आंबा उत्पादन कमी असल्याने कमी दरात द्यावा लागत आहे. आवक वाढू लागल्याने तो दर आणखी घसरण्याची भीती आंबा व्यावसायिकांमध्ये आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंबा प्रक्रिया करण्यासाठी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, अहमदाबाद,  पंजाब आदी ठिकाणी पाठविला जातो. उत्पादनात घट झाल्याने एप्रिलमध्येच प्रक्रियेसाठी आंब्याची आवक होऊ लागली आहे. जिल्ह्यात अनेक कॅनिंग व्यावसायिक आहेत. तसेच येथील औद्योगिक वसाहतीतही अनेक फळप्रक्रिया उद्योजक आहेत. मात्र, ते स्थानिक आंबा घेण्यापेक्षा परजिल्ह्यांतील स्वस्त आंबा कॅनिंगसाठी घेतात. तसेच रत्नागिरीचा आंबा म्हणूच उत्पादनाचे मार्केटिंग करतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ कॅनिंगला उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत अनेक आंबा उत्पादक परजिल्ह्यांत मिळेल त्या भावाने आंबा कॅनिंगच्या दारात नेऊन ठेवतात. अलीकडेच एका महोत्सवात येथील आ. उदय सामंत यांनी येथील औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया उद्योजकांना परजिल्ह्यांतील आंबा  आयात करण्यासाठी बंदी आणण्याची मागणी केली होती. मात्र, ती त्या व्यासपीठापुरतीच मर्यादित राहिल्याने  कॅनिंगसाठी येथील उत्पादकांना परजिल्ह्यांतील व्यावसायिकांना आंबा द्यावा लागत असल्याची प्रतिक्रिया येथील बागायतदारांनी व्यक्‍त केली. 

Tags : Hapus, Mango, Canning, Market