Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Konkan › ज्ञानदा पोळेकर मृत्यू; तीन डॉक्टरांवर गुन्हा

ज्ञानदा पोळेकर मृत्यू; तीन डॉक्टरांवर गुन्हा

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पावसकर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या ज्ञानदा पोळेकर  यांच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहरातील तीन डॉक्टरांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. संजीव पावसकर, डॉ. दीपा पावसकर तसेच डॉ. गिरीष करमरकर (सर्व रा. रत्नागिरी) अशी डॉक्टरांची नावे आहेत. ज्ञानदाचे पती प्रणव प्रमोद पोळेकर (रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.  10 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वा. ज्ञानदा पोळेकर यांना होणार्‍या त्रासाचे कोणतेही निदान न करता परिणामकारक उपचारांअभावी त्यांचा मृत्यू होऊ शकतो,  याचे ज्ञान असतानाही ज्ञानदा यांची प्रकृती अत्यवस्थ होईपर्यंत कर्मचार्‍यांना दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करून डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले होते; पण योग्य वेळेस उपचार न झाल्यामुळे  ज्ञानदा यांचा मृत्यू झाला.

पावसकर दाम्पत्याची पोलिसांकडून उशिरापर्यंत चौकशी

ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुधवारी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत यातील पावसकर दाम्पत्याची शहर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. या दरम्यान, पोलिस ठाण्याबाहेर शहरातील नामांकित डॉक्टरांनी गर्दी केली होती.