Thu, Apr 25, 2019 14:13होमपेज › Konkan › गुजरात विजयाचा रत्नागिरीत जल्‍लोष

गुजरात विजयाचा रत्नागिरीत जल्‍लोष

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 11:03PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्याचा आनंद शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत साजरा केला. ढोल -ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव जल्‍लोषात साजरा करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यशस्वी झाले आहे. या निकालाचा सुरुवातीचा कल पाहता काँग्रेसने काही काळ आघाडी घेतली होती. पण नंतर भाजपने आघाडी घेतली. निकालानंतर सर्वत्र एकच जल्‍लोष सुरू झाला.

रत्नागिरीतही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. लाडूचे वाटप करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नाना शिंदे, उमेश कुलकर्णी, सतीश शेवडे, बिपीन शिवलकर,राजश्री शिवलकर, राजू भाटलेकर आदी उपस्थित होते