होमपेज › Konkan › कोंडकारूळ येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोंडकारूळ येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 12:04AMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारूळ येथे संजय सदानंद पोळेकर (वय 38) या तरुणाने माटलवाडीतील जंगलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार दि. 14 रोजी सकाळी 7.30 वा. उघडकीस आला. या घटनेची फिर्याद कोंडकारूळचे सरपंच प्रशांत अनंत पोळेकर (वय 52) यांनी गुहागर पोलिसांत दिली. मृत संजय पोळेकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय हा व्यसनी असून तो मिळेल ते काम करायचा. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. दीपक दत्ताराम नाटुस्कर यांनी माटलवाडीच्या वरच्या बाजूला जंगलामध्ये एका झाडाला मृतदेह लटकत असल्याचे पाहिले. त्यानंतर वाडीतील संदेश पोळेकर, दीपक पोळेकर, विनायक पोळेकर, नरेंद्र पाटील या सर्वांनी जंगलामध्ये जाऊन पाहणी केली असता तो संजय सदानंद पोळेकर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गुहागर पोलिसांना कळविण्यात आले. अधिक तपास पोलिस कर्मचारी कादवडकर करीत आहेत.