Tue, Nov 20, 2018 04:12होमपेज › Konkan › गुहागरमध्ये सत्तांतर; शहर विकास आघाडीला बहुमत

गुहागरमध्ये सत्तांतर; आमदार जाधव यांना धक्का

Published On: Apr 12 2018 10:35AM | Last Updated: Apr 12 2018 11:31AMगिमवी : लक्ष्मीकांत घोणसे पाटील

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायतीत शहरविकास आघाडीने १७ पैकी ०९ जागा जिंकत बहुमत मिळवले.शहरविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश बेंडल विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे दीपक कनगुटकर, भाजपचे रविंद्र  बागाकर  यांचा पराभव केला. यामुळे आमदार भास्करराव जाधव यांना धक्का बसला आहे.

गुहागर नगरपंचायतीत १७ जागांसाठी निवडणुक घेण्यात आली. यात शहर विकास आघाडीच्या ०९, भाजपच्या ०६ उमेदवारांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.  राष्ट्रवादी ०१ आणि शिवसेनेच्या १ उमेदवारांनी विजय मिळवला. 

गुहागर  नगरपंचायतीचे विजयी उमेदवार 

शहर विकास आघाडी : नेहा सांगळे, मनाली सांगळे, वैशाली मालप, माधव साटले, प्रणित साटले, स्नेहल देवाळे, अमोल गोयथळे, प्रसाद बोले, स्नेहा भागडे

भाजप : उमेश भोसले, समीर घाणेकर , गजानन वेल्हाळ, अरुण रहाटे, भाग्यलक्ष्मी कानडे,  मृणाल गोयथळे 

राष्ट्रवादी : सुजाता बागकर

शिवसेना : नीलिमा गुरव
 

शहर विकास आघाडी आणि भाजप, यांच्यातच खरी लढत बघायला मिळाली. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव झाला.

Tags : Guhagar, Nagar Panchayat, Elections, Result,