Tue, Mar 26, 2019 02:05होमपेज › Konkan › गुहागर न.पं. निवडणुकीत रंगत

गुहागर न.पं. निवडणुकीत रंगत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शृंगारतळी : वार्ताहर

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार अवस्थेत आली असून अवैध ठरविण्यात आलेले बारा उमेदवारांचे अर्ज अखेर खेड जिल्हा सत्र न्यायालयाने वैध ठरविले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस वाढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जात प्रमाणपत्र नसल्याने 12 जणांचे अर्ज अवैध ठरवले होते. निर्णयाविरोधात येथील बारा उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. याप्रकरणी न्यायालयाने केलेल्या सुनावणीनंतर गुरुवारी सकाळी निर्णय जाहीर केला.  आता या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीचे प्रदीप बेंडल, अपक्ष राजेंद्र आरेकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचेही अर्ज वैध ठरले आहेत.   

आता या निवडणुकीत सतरा जागांसाठी राष्ट्रवादीकडून 20, शहर विकास आघाडीचे 10, भाजपकडून 13, शिवसेनेचे 8, आरपीआय 1, अपक्ष 3 अशा 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील सेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आणखी दोन दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. दि. 6 एप्रिल रोजी मतदान असून शहर विकास आघाडी व भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे.

प्रभाग एकमधून सुजाता बागकर (राष्ट्रवादी), प्राची आरेकर (शिवसेना), दीपाली मोरे (भाजप). यामुळे प्रभाग एकमध्ये तिरंगी लढत आहे. प्रभाग दोनमध्ये दक्षता मोरे (राष्ट्रवादी), अनघा कुचेकर (भाजप), मनाली भांगडे (अपक्ष). प्रभाग सहामध्ये विनायक बारटक्के (राष्ट्रवादी), विलास वाघधरे (शिवसेना), प्रभाग नऊमध्ये स्नेहल वरंडे (भाजप), वैशाली मालप (अपक्ष), शीतल कदम (आरपीआय). प्रभाग दहामध्ये दिगंबर चव्हाण (राष्ट्रवादी), प्रसाद बोले (अपक्ष), या उमेदवारांचे अर्ज न्यायालयाच्या निर्णयामुळे वैध ठरले आहेत.


  •