Thu, May 28, 2020 16:37होमपेज › Konkan › आमदार भास्कर जाधव 'घरवापसी' करणार? 

आमदार भास्कर जाधव 'घरवापसी' करणार? 

Published On: Aug 25 2019 8:06PM | Last Updated: Aug 25 2019 8:06PM

आमदार भास्कर जाधवगुहागर : पुढारी ऑनलाईन 

विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिला असल्याने राज्यात पक्षांतर करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये कोणाला आधी गळ लावतो यावरून जणू शीतयुद्धच रंगले आहे.  

आता या यादीमध्ये कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि गुहागर येथील आमदार भास्कर जाधव शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यांनी आज (ता.२५) मातोश्रीवर जाऊन  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. 

राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यत पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे आता आमदार भास्कर जाधवही  धक्का देणार का? यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले भास्कर जाधव घरवापसी करणार का? याचीही चर्चा आहे. 

सातार्‍याचे राष्ट्रवादी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पूरग्रस्तांना मदत निधी मिळावा हे या भेटीचे कारण सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र उदयनराजेंची ही भेट भाजप प्रवेशासंदर्भात होती, अशी जोरदार चर्चा रंगली.

उदयनराजेंनीही भाजप प्रवेशाच्या वृत्तांचे थेट खंडण केले नाही. त्यांचे जवळचे समर्थकही भाजपच्या प्रवेशाच्या तयारीला लागलो असल्याचे सांगत आहेत. काहींनी तर मुहूर्तही जाहीर केलेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असे जाहीरपणे सांगत आहेत.