Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Konkan › भारत अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू

भारत अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शृंगारतळी : वार्ताहर / गुहागर : प्रतिनिधी

‘गेल’ने उभारलेल्या दाभोळ-बंगळूर गॅस पाईपलाईन आरजीपीपीएलच्या ताब्यातून विभक्‍त झाली आहे. त्याचे ‘कोकण एलएनजी प्रा. लि.’ असे नामकरण करण्यात आले  आहे. अमेरिकेतून आयात केलेला नैसर्गिक वायू ‘गेल’च्या जहाजातून दाभोळला दाखल झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधाची नवी सुरुवात या कराराने झाली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अंजनवेल येथील ‘गेल’च्या प्रकल्पस्थळावर झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत शुक्रवारी सकाळी ना. धर्मेंद्र प्रधान बोलत होते. त्यांच्यासोबत भारतीय अमेरिकेतील दुतावासातील वाणिज्य विभागातील  जॉईंट सेक्रेटरी होनावर व ‘गेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. सी. त्रिपाठी उपस्थित  होते.   ना. प्रधान यांनी ‘गेल’च्या अधिकार्‍यांसमवेत ‘एलएनजी’ जेटीसह अमेरिकेतून आलेल्या जहाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-अमेरिकेच्या व्यापारी करारानुसार भारताच्या ‘गेल’ कंपनीने अमेरिकेशी केलेल्या करारानुसार पहिले जहाज  पश्‍चिम किनारपट्टीवर अंजनवेल येथे दाखल झाले आहे.
 

 

 

tags ; Guhagar,news, India,US, new, commercial, era,


  •