Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Konkan › केंद्रीय पेट्रोलियम मंत्री उद्या गुहागर दौर्‍यावर

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री उद्या गुहागर दौर्‍यावर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गुहागर : प्रतिनिधी

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान 29 मार्च रोजी गुहागर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते अंजनवेल येथील ‘आरजीपीपीएल’ प्रकल्पाला भेट देणार असून त्यांच्या उपस्थितीत ‘एलएनजी गॅस टर्मिनल’चे ‘कोकण गॅस टर्मिनल’ असे नामकरण होणार आहे. 1 एप्रिलपासून ते नव्या नावाने ओळखले जाईल, असे सूत्रांकडून समजते.  एन्‍रॉन प्रकल्प बंद पडल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने 2005 मध्ये दाभोळ वीज प्रकल्प सुरू केला. त्यानंतर या कंपनीचे नाव ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट लि.’ असे झाले. बंद यंत्रसामग्रीची दुरुस्ती केल्यानंतर प्रकल्पातून वीजनिर्मिती होऊ लागली. सुरुवातीच्या काळात महावितरणने ही वीज खरेदी केली. मात्र, गॅसचा तुटवडा झाल्याने आणि वाढीव किमतीमुळे ही वीज महागडी ठरू लागली.

त्यामुळे महावितरणने वीज खरेदीस नकार दिला. त्यामुळे या प्रकल्पावर बंदचे संकट कोसळले. 2014 मध्ये केंद्र व राज्य शासन बदलल्यानंतर भारतीय रेल्वेने वीज खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्या नुसार दररोज 500 मेगावॅट वीज या प्रकल्पातून भारतीय रेल्वे खरेदी करत आहे. याबरोबरच एलएनजी गॅसवर वीजनिर्मितीचा खर्च परवडणारा नाही. यामुळे जोड व्यवसाय म्हणून एलएनजी टर्मिनलमध्ये परदेशातून आलेला गॅस पाईपलाईनद्वारे बंगळूर आणि गोवा येथील उद्योगांना पुरवला जाऊ लागला. त्यातून व्यवस्थापनाला फायदा झाला.  सध्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प दोन कंपन्यांच्या भागीदारीतून सुरू आहे. या निमित्ताने प्रकल्पग्रस्त व कामगार संघटना आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडणार असल्याचे वृत्त आहे.
 

 

 

 

tags ; Guhagar,news,Central Petroleum Minister visits Guhagar


  •