Wed, Apr 24, 2019 19:56होमपेज › Konkan › मराठमोळ्या स्वागतयात्रेने नववर्षाचे स्वागत

मराठमोळ्या स्वागतयात्रेने नववर्षाचे स्वागत

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:47AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी हिंदू नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी फडकणारे भगवे झेंडे, रस्त्या-रस्त्यांवरील रांगोळ्या, ‘जय हिंदू..’सारख्या घोषणांसह   हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत संपूर्ण शहर दुमदुमून गेले. यावेळी हजारो नागरिकांनी चित्ररथांसह मराठमोळ्या परंपरेने भव्यदिव्य स्वागतयात्रा काढली. पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक संदेश देणार्‍या 56 चित्ररथांसह देवदेवतांचे जिवंत देखावेही साकारण्यात आले होते. 

शहरात ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातून सुरू झालेली यात्रेची समाजमंदिर पतितपावन मंदिर येथे सांगता झाली. ढोल-ताशांसह वेगवेगळ्या पारंपरिक वाद्यांसह फटाक्यांच्या आतषबाजीने शहरातील संपूर्ण वातावरण भगवे बनले होते.