Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Konkan › पालकमंत्र्यांसमवेतची जनआक्रोश संयोजक कमिटीची बैठक निष्फळ

पालकमंत्र्यांसमवेतची जनआक्रोश संयोजक कमिटीची बैठक निष्फळ

Published On: Mar 19 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 1:50AMदोडामार्ग : प्रतिनिधी

पालकमंत्री दीपक केसरकर आणि आरोग्याचा जनआक्रोश संयोजक कोअर कमिटची बैठक रविवारी निष्फळ ठरली. जोवर गोवा राज्यात रुग्ण शुल्क फी आकारणी बंद केली जाणार नाही. तोवर मंगळवार 20 मार्च पासून सुरू होणारे बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कमिटीने बैठकीत दिला. 

मंगळवारी 20 मार्च रोजी येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने तालुकावासीय आरोग्याचा जनआक्रोश याविषयी विविध प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. आंदोलनाला हजारो नागरिक उपस्थित राहतील. संयोजकांनी गावोगावी जनजागृती केल्याने आंदोलन यशस्वी होणार आहे. नियोजन करणार्‍या कोअर कमिटीची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दुपारी गणेश मंदिरात भेट घेतली.

त्यानंतर बर्‍याच वेळ दोघांत चर्चा झाली. जिल्हयातील रुग्णांवर गोवा राज्यातील बांबोळी येथे रुग्ण शुल्क आकारले जाते. यांवर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी गोवा सरकारला देण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. पण कोअर कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी आम्हाला जोवर लेखी मिळत नाही तोपर्यंत आमचा कुणावरही विश्‍वास नसल्याचे स्पष्ट केले. 

गोवा सरकार रूग्ण शुल्क फी घेणे जेव्हा बंद करेल तेव्हाच आमचे आंदोलन मागे घेण्यात येईल. या मागणीबरोबर अन्य मागण्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी अवधी लागतोच आपण सर्व मागण्या तुमच्या पूर्ण करू, पण आंदोलनकर्ते यांनी आपणास लेखी पत्र मिळत नाही, तोवर मंगळवार पासून सुरु होणारे आंदोलन मागे घेणार नाही. असा ठाम निर्धार केला आहे. यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांशी केलेली मध्यस्थी असफल ठरली आहे. मंगळवारी आरोग्याचा जनआक्रोश या मथळयाखाली तालुक्यातील हजारो बांधव आरोग्याचा विविध प्रमुख, महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत.संयोजक वैभव इनामदार, अभिजीत खांबल, बाळा गवस, संजय सातार्डेकर यांसह  बहुसंख्येने उपस्थित होते.