Sat, Mar 23, 2019 18:41होमपेज › Konkan › महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया : ना. केसरकर

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया : ना. केसरकर

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:22PMसिंधुदुर्ग :  

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करुया, असे अवाहन  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांसह रत्नागिरीचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कुडाळचे प्रांताधिकारी  विकास सूर्यवंशी आदी  उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 107 जणांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना  अभिवादन करुया, असे सांगून पालकमंत्री म्हणाले. आपणा सर्वांच्या सहकार्यातून आपल्या जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करण्याचा संकल्प  आज करुया. या निमित्ताने एका लक्षणीय घटनेची मी नेहमी आठवण करतो ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 रोजी बरोबर 37 वर्षांपूर्वी झाली. आज सिंधुदुर्ग स्वच्छता, पर्यंटन, शिक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक अशी कामे करत आहे असे ते म्हणाले. यावेळी पोलिस, महिला पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला गृहरक्षक दल, वन विभाग यांनी शानदार संचलन केले. तसेच वज्र वाहन, श्वान पथक, दंगल नियंत्रण पथक व जलद प्रतिदास पथकानेही संचलनामध्ये सहभाग घेतला.

Tags : konkan, Grow, Maharashtra, glorious, tradition