Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Konkan › ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज

ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी

खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून मनमानी कारभार करत आहेत. ते ग्रामसेवकांशी चर्चा करताना गलिच्छ भाषेचा वापर करत आहेत. त्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून जिल्हात आज झालेल्या आढावा बैठकीत ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

खेड पंचायत समितीमध्ये आल्यापासून ते ग्रामसेवकांचा तिरस्कार करीत आहेत. आढावा सभेत, फोनद्वारे ग्रामसेवकांशी संवाद साधताना एकेरी शब्दप्रयोग व गलिच्छ भाषेचा वापर करीत आहेत. त्यांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी यासाठी त्यांना जिल्हा संघटनेतर्फेही त्यांना समज देण्यात आलेली आहे. असे असतानाही गेल्या 2  वर्षांत त्यांच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही.  

त्यामुळे त्यांच्या विरोधात रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेमार्फत आंदोलन पुकारण्यात येत असून याचा भाग म्हणून जुलैच्या पहिल्या आढावा सभेत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा असहकार आंदोलन करू, असे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा रत्नागिरीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.