Mon, Aug 19, 2019 11:56होमपेज › Konkan › ग्रा.पं.निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी

ग्रा.पं.निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वैभववाडी : प्रतिनिधी 

सांगूळवाडी येथे हळदी समारंभ सुरू असतानाच ग्रा.पं.निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली.या मारहाणीत ग्रा.पं.सदस्य गुरुनाथ राणे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी तुषार गुरव व गुरुनाथ राणे यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार तिघांवर वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी रात्री 10 ते 11.30 वा.च्या सुमारास घडली.

फिर्यादी तुषार गुरव व गुरुनाथ राणे (रा.नावळे) हे सांगुळवाडी येथील एका हळदी समारंभाला गेले होते.याठिकाणी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली.  यामध्ये गुरुनाथ राणे यांनी तुषार गुरव याला गाडीतील टाँमीने  माराहाण केली. यामध्ये त्याला दुखापत झाली. तुषार याने नावळे येथे घरी जाऊन ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. तुषारचे वडील रमेश तुकाराम गुरव व त्यांचा भाऊ अक्षय गुरव हे मोटार सायकल घेऊन नावळे ब्राम्हणाचा व्हाळ याठिकाणी आले असता गुरुनाथ राणे  यांनी आपल्या ताब्यातील मँजिक गाडीने मोटारसायकलला मागून धडक दिली.

अशी फिर्याद तुषार गुरव यांनी दिली आहे.  त्यानुसार गुरुनाथ राणे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर गुरुनाथ राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपण सांगुळवाडीहून घरी नावळे येथे मँजिक गाडी घेऊन जात असताना ब्राम्हणाचा व्हाळ येथे रमेश गुरव यांनी आपली मोटारसायकल आडवी लावून गाडी थांबून दगडाने माराहाण करुन गंभीर जखमी केले केल्याची फिर्याद दिली आहे.त्यानुसार रमेश व अक्षय गुरव यांच्यावरही  गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

या माराहाणीत गुरुनाथ राणे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीतील वादाचे पर्यावसन या माराहाणीत झाल्याचे बोलले  जात आहे. या प्रकरणी आधिक तपास पोलिस करत आहेत.