Fri, Nov 16, 2018 19:52होमपेज › Konkan › वेंगुर्ले मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

वेंगुर्ले मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:24PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्लेचे मंडळ अधिकारी बापू मारुती तुळसकर (55) यांना 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे श्री. तुळसकर हे तलाठी म्हणून कार्यरत असताना 1987 साली अशीच लाच घेताना रंगेहाथ मिळाल्याने त्यांना अटक झाली होती.  

आठ महिन्यांपूर्वी वेंगुर्ले तालुक्यात अशा प्रकारचेे दोन गुन्हे उघडकीस आले होते.  वेंगुर्ले तहसील कार्यालयात  झालेल्या या प्रकारामुळे  तालुका महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर जनतेमधून अशा अधिकार्‍यांबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी तक्रारदाराने वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील आपली जमीन सपाटीकरण केली आहे.