Wed, Feb 20, 2019 10:40होमपेज › Konkan › शासकीय रुग्णालय झाले चकाचक

शासकीय रुग्णालय झाले चकाचक

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 9:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सद‍्गुरू बाबा हरदेवजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याअंतर्गत रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

या अभियानाचा प्रारंभ डॉ. विकास कुमरे, नगरपरिषद नियोजन सभापती सुहेल मुकादम, विक्रांत चव्हाण, दिनकर कांबळे, मंडळाचे संयोजक रमाकांत खांबे, संचालक बाबाजी नवेले, सुचिता पिलणकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भगवान मोटे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. सकाळी 9 ते 1 या वेळेत जिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. रुग्णालय व नगरपरिषद रत्नागिरी यांनी आवश्यक साहित्य व कचरा उचलण्यासाठी गाडी दिल्याबद्दल संयोजक रमाकांत खांबे यांनी त्यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला.