Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Konkan › पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:33AM

बुकमार्क करा
शृंगारतळी : वार्ताहर

गेली 21 वर्षेे अमाप उत्साहात सुरू असलेली पाटपन्हाळे मॅरेथॉन याही वर्षी प्रचंड उत्साहात पार पडली. यावर्षी तब्बल 42.195 कि.मी. अंतराची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.तर खुल्या गटामध्ये महिलांसाठी 21.098 कि.मी.एवढे अंतर ठेवण्यात आले होते.10 वर्षांखालील मुले आणि मुलींपासून घेतलेल्या या स्पर्धेत दापोलीच्या मुलांचा वरचष्मा राहिला.सांघिक गटाचे पुरूषांचे प्रथम पारितोषिक गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठित राजे अ‍ॅकॅडमी गिमवीने पटकावले तर महिलांमध्ये हर्णे स्पोर्ट्स क्लब दापोलीने सांघिक महिलांचे प्रथम बक्षिस मिळविले.

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गेली 21 वर्षे ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहे.यावर्षी पूर्ण मॅरेथॉनसाठी 42 कि.मी. अंतर ठेऊन ही स्पर्धा कोकण विभागासाठी ठेवण्यात आली होती.सुमारे 9 हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.10 वर्षाखालील मुले आणि मुली, 14 वर्षाखालील मुले आणि मुली, 18 वर्षाखालील मुले आणि मुली, महिला आणि पुरूषांसाठी खुला गट, ज्येष्ठ नागरिक पुरूष आणि महिला अशा 10 भागांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.

10 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक मनाली महेंद्र खरे जि.प.शाळा कोळबांदे्र, 10 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक पार्थ गजानन चोगले हर्णे स्पोर्ट्स क्लब दापोली, 14 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक ऋतुराज रविंद्र हुमणे सह्याद्री स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सावर्डे, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक साक्षी संजय जड्याळ सह्याद्री स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सावर्डे, 18 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक रिया संदीप शिंदे डि.बी.जे. चिपळूण, 18 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक सागर अशोक म्हसकर राजे अ‍ॅकॅडमी गिमवी यांनी मिळविला.

खुल्या महिला गटातील 21 कि.मी.अंतर चिपळूणच्या प्रमिला पांडूरंग पाटील हीने 01.38.09 वेळेत पार पडून प्रथम क्रमांक मिळविला.सर्वात महत्त्वाची प्रतिष्ठित शर्यत खुल्या गटातील पुरूषांसाठी 42.195 कि.मी.होती. ही स्पर्धा जे.एस.डब्ल्यू. वाशिंद ठाणे च्या अनिल शिवाप्पा कोरवी याने 02.49.36 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला तर डी.बी.जे.चिपळूणचा अविनाश गजानन पवार याने हेच अंतर 02.52.40 वेळेत पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला, तृतीय क्रमांक राजे अ‍ॅकॅडमी गिमवीच्या दिनेश म्हात्रे याने 03.01.42 वेळेत पार करून मिळविला.

ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत रत्नागिरी नेहुटराम शंकर विश्‍वकर्मा याने प्रथम तर मनिषा रामदास जानवलकर यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यासाठी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंत गिते, संस्थेचे चेअरमन भालचंद्र चव्हाण, उद्योजक राजन झवेरी, एशियन आर्टचे श्री.राजन झवेरी व देशपांडे, बँक ऑफ इंडियाचे शशिकांत बडबडे, निवृत्‍त परिवहन आयुक्‍त डी.जी.जाधव, सारस्वत बँकेचे अतुल निफाडकर, जि.प.महिला बालकल्याण सभापती ऋतुजा खांडेकर, सेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. नियोजन प्रा.संजीव मोरे व सहकार्‍यांनी केले.