Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Konkan › ढोलकी विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

ढोलकी विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 9:16PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणेशोत्सवात घरोघरी म्हटल्या जाणार्‍या आरतीवेळी ढोलकी आणि टाळ वाजवले जातात. त्यामुळे या दिवसांमध्ये ढोलकी व टाळ यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे ढोलक्यांना नवा साज चढवण्यासाठी ढोलकी कारागीर सध्या दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. गणेशोत्सवानिमित्त ढोलकी विके्रते आणि कारागिरांना अच्छे दिन आले आहेत

कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हटले की भजन, कीर्तन, सामूहिक आरत्या, जाखडी, टिपर्‍या यांना ढोलकी आणि टाळची साथ नेहमीच वाहवा देणारी ठरते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात  ढोलकी, मृदंगाच्या दुकानात दुरुस्तीची कामे जोर धरू लागतात. दुकानांमध्ये हल्ली टाळमध्येही विविध प्रकार दिसू लागले आहेत तर ढोलकीतही बरेच वैविध्य पहावयास मिळत आहे. सध्या बाजारपेठेतील ढोलकी व टाळ विक्रेत्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. ढोलकी तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चामडे वापरले जाते. याच्या किमतीही जास्त आहेत. ही वाद्ये तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे या वाद्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

अनेक गणेशोत्सव मंडळे जुन्या ढोलक्यांना नवा साज चढवताना दिसत आहेत. जुनी ढोलकी नवी बनविण्यासाठी 1 हजार ते चार हजार रुपये खर्च येत आहे. तर ढोलकीला लावण्यासाठी शाही पान 800 ते 100 रुपयांना मिळते. शाई लावण्यासाठी 300 रुपये एका ढोलकी मागे घेतले जातात. तसेच मृदंगाची एक बाजू भरण्यासाठी 1 हजार रुपये घेतले जात आहेत. तर आरतीसाठी लागणारे टाळ हेदेखील 100 ते 500 रुपयांपर्यंत मिळत आहेत.