Thu, Feb 21, 2019 04:59होमपेज › Konkan › देवरूखच्या विलास रहाटेला सुवर्णपदक

देवरूखच्या विलास रहाटेला सुवर्णपदक

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:52PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी

देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थी विलास रहाटे याने फाईन आर्ट या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. उदयपूर येथे पार पडलेल्या पश्‍चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

33 वा आंतर विद्यापीठ युवा महोत्सव मोहनलाल सुभादिया विद्यापीठ, उदयपूर येथे पार पडला. यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या संघात देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा कला शाखेचा विद्यार्थी विलास रहाटे याची निवड झाली होती. विद्यापीठाच्या फाईन आर्ट या विषयात क्ले मॉडेलिंग या कलाप्रकारात विलासने सहभाग घेतला होता. यंदा या  विभागात संघर्ष हा विषय देण्यात आला होता. विलास रहाटे याने साकारलेले ‘सिंह’ आणि ‘मगर संघर्ष’ हे क्ले मॉडेल सर्वोत्कृष्ट ठरले. या मॉडेलसाठी विलास यास सुवर्णपदक बहाल करण्यात आले. फेब्रुवारी 2017 मधे रांची येथे होणार्‍या भारतीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व विलास रहाटे करणार आहे.

विलास रहाटे यास या स्पर्धेसाठी निवृत्त कलाशिक्षक विजय आंबवकर, सोनवडे प्रशालेचे कलाशिक्षक विष्णू परिट आणि पाध्ये स्कूलचे सूरज मोहिते यांनी मार्गदर्शन केले होते.